पुणे – मुंबई -पुणे महामार्गावर पाषाण येथे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने अतिक्रमणे काढण्याची जोरदार कारवाई केली.
या सर्व भागातील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉल आदी अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे वतीने जोरदार कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सुमारे एक लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले. सदर बांधकाम हे संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत संरक्षण विभागाकडून अनेकदा तक्रार करण्यात आली होती.
ही कारवाई सुरूच राहणार असून, पुढील आठवड्यातही उरलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विकसन विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
या कारवाईत कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, १५ बिगारी आणि पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कारवाईदरम्यान कोणताही अनुचितप्रकार, विरोध होऊ नये, यासाठी हिंजवडी पोलीसांनी सहकार्य केले.
ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ यांनी पूर्ण केली.