Emraan Hashmi । बॉलिवूडमध्ये सीरियल किसर या टॅगने प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मीने टायगर 3 मधून आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. आता हा अभिनेता सर्वात देखणा खलनायक म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे.
इमरान नुकताच तेलगू चित्रपट OG साइन केला आहे, ज्यामध्ये तो प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याणसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात इमरान खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
इम्रानने आपल्या करिअरची सुरुवात चॉकलेट हिरो म्हणून केली होती. सलग 15 वर्षे तो या रोमँटिक पात्रात दिसला. त्याने एकामागून एक रोमँटिक चित्रपट केले. पण नंतर त्याने शांघाय आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई सारखे चित्रपट केले, ज्यात त्याचे पात्र ग्रे शेडमध्ये दाखवले गेले.
या इमेज ब्रेकबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आणि म्हणाला,’असा बदल करणे कठीण आहे, कारण ते तुम्हाला पुन्हा एका बॉक्समध्ये बंद करू शकते. मला इतका कंटाळा आला होता की प्रत्येक सेटवर मी स्लीपवॉक करायचो.’
इम्रान म्हणाला,’हा खरोखर मोठा सापळा आहे. अनेक हॉलीवूड अभिनेते कदाचित बाँडसारखी पात्रे साकारणे टाळतात, कारण काहीवेळा तुम्ही हळूहळू चौकटीत पडतात. ते म्हणतात की, ते तुमच्या करिअरसाठी हानिकारक आहे कारण जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडता तेव्हा लोक तुमच्याकडे दुसरे काहीही म्हणून पाहत नाहीत.’ असं म्हणत त्याने पुढे सांगितले की, त्याला या पात्रांचा कंटाळा आला आहे.
इम्रानच्या ‘ओजी’ या चित्रपटात पवन कल्याणसोबत प्रियांका अरुल मोहनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तमिळ अभिनेता अर्जुन दासही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.