तांत्रिक बिघाडामुळे आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक ‘अपाचे’ हेलिकॉप्टरला चक्क शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय. ‘अपाचे’ हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकन बनावटीचे असून विशेष म्हणजे ही हेलिकॉप्टर्स मागच्याचवर्षी हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालीयेत.
याबाबतची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली असून पठाणकोट एअर बेसवरुन उड्डाण केल्यानंतर या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे वैमानिकाने पंजाब येथील होशिआरपूरमधील एका गावाच्या शेतामध्ये ‘अपाचे’चं इमर्जन्सी लँडिंग केलं. इंडियन एअर फोर्सने याबाबत माहिती देताना “कंट्रोल पॅनलमध्ये वॉर्निंग अलर्ट आल्यामुळे खबरदारी म्हणून या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले” असे सांगितले.
सुदैवाने इमर्जन्सी लँडिंगदरम्यान कोणालाही इजा झाली नसून ‘अपाचे’वरील सर्व क्रू पूर्णपणे सुरक्षित आहे. ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचे देखील यामध्ये काही विशेष नुकसान झाले नाही.
The attack choppers are based out of the Pathankot airbase and this chopper had taken off from there. The Air Force will check the helicopter and then take it back to its base. The pilots are safe: Indian Air Force (IAF) Sources (2/2) https://t.co/ACtXpxL3Ks
— ANI (@ANI) April 17, 2020