ऑस्ट्रेलियात वणव्यामुळे आणीबाणी 

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियातील सर्वात गजबजलेल्या न्यू साऊथ वेल्स भागात लागलेल्या वणव्यामुळे आतापर्यंत 150 घरे भस्मसात झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रांतामध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे.

या प्रांतातील नागरिकांसमोर आगामी आठवड्याभरासाठी अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण आहे, असे न्यू साउथ वेल्सचे राज्य आपत्कालीन सेवामंत्री डेव्हिड इलियट यांनी सांगितले. राज्याच्या ईशान्येकडील आगीमुळे 8 लाख 50 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील वनसंपदा, शेती आणि गवताळ जमीन जळून खाक झाली आहे.

आपत्तीजनक हवामानामुळे गोष्टी फार लवकर बदलू शकतात. सध्या सुरक्षित वाटू शकणारी परिस्थिती वाऱ्यामुळे आणखी काही काळात अत्यंत असुरक्षित बनू शकते, असे प्रीमियर ग्लेडिस बेरेजिक्‍लियन यांनी सिडनी येथे पत्रकारांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.