ICC Ranking : दीपक चहरची टी-२० क्रमवारीत मोठी झेप

दुबई : बांगलादेशविरूध्द झालेल्या तिस-या टी-२० सामन्यात भारताचा गोलंदाज दीपक चहरने शानदार गोलंदाजी करत बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेतला. चहरने ३.२ षटकांत ७ धावा देत ६ गडी बाद केले. तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोकृष्ट गोलंदाजीचा विक्रमसुध्दा आपल्या नावे केला.

बांगलादेशविरूध्द तिस-या व निर्णायक टी-२० सामन्यात केलेल्या शानदार कामगिरीचा फायदा दीपक चहरला क्रमवारीत झाला आहे. चहरने आयसीसी टी-२० क्रमवारीमध्ये ८८ स्थांनाची झेप घेतली आहे. त्यामुळे चहर क्रमवारीत ४२ व्या स्थानावर आला आहे. टी-२० क्रमवारीमध्ये अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या तर न्यूझीलंडचा मिशेल सॅटनर दुस-या स्थानी आहे.

याशिवाय इतर भारतीय गोलंदाजामध्ये क्रुणाल पंड्याने ६ स्थानांची, युजवेंद्र चहलने ९ तर वाॅशिंग्टन सुंदरने २१ स्थानाची झेप घेतली आहे. त्यामुळे पंड्या १८ व्या, चहल २५ व्या आणि वाॅशिंग्टन सुंदर २७ व्या स्थानी पोहचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.