न्यूयॉर्क : टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सध्या एक ट्विट करून जगात खळबळ उडवली आहे. त्यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये थेट ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत त्यांच्या युझर्सलाच सवाल केला आहे. तसेच या पदावर मी राहावं का असे म्हणार नवा पोल तयार केला आहे.
एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देईल त्याप्रमाणे आपण करू असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला येत आहे.
Should I step down as head of Twitter? I will abide by the results of this poll.
— Elon Musk (@elonmusk) December 18, 2022
एलॉन मस्क यांच्या ट्विटमध्ये, “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? मी या ट्विटर पोलच्या निकालाला बांधील असेन.” असे म्हटले गेले आहे. या ट्वीटवर मस्क यांचे चाहते त्यांनी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होऊ नये असं सांगत आहेत. दुसरीकडे मस्क यांच्या निर्णयांवर नाखूश वापरकर्ते या ट्विटर पोलला काहीही अर्थ नाही, असे सांगत आहेत.
मस्क यांच्या एका ट्विटमुळे अनेक उद्योगपती आणि कर्मचाऱ्यांचे भविष्य ठरणार आहे असेच म्हणावे लागेल. कारण ट्विटर कंपनी विकत घेण्याची ऑफर सुद्ध मस्क यांनी ट्विटरवरच दिली होती. त्यानंतर आता मस्क यांनी राजीनामा देण्याबाबत्या निर्णयाबाबत नेटकऱ्यांकडे विचारणा केली आहे. या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.