कोलकाता – लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सचा एलिमिनेटरचा महत्त्वपूर्ण सामना आज रॉयल चॅलेंजर बेंगळुरूशी होणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांची आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर लखनौचेच पारडे जड राहणार आहे.
Hello from the Eden Gardens, Kolkata. 👋
The @klrahul-led @LucknowIPL take on the @RCBTweets, led by @faf1307 in Eliminator of the #TATAIPL 2022. 💪 💪 #LSGvRCB
Which team are you rooting for tonight? 🤔 🤔 pic.twitter.com/mwcWYydfmY
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
यंदाच्या स्पर्धेत लखनौचा संघ पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. मात्र, राहुल संघाचे नेतृत्व उत्तम पद्धतीने करत असून, त्यानेच संघाची यशस्वी मोट बांधत या फेरीत प्रवेश केला आहे. लखनौ संघात कर्णधार म्हणून राहुल सातत्य राखू शकला नसला तरीही आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्कस स्टोनिस यांनी फलंदाजीत तर आवेश खान, मोहसीन खान, दुष्मंत चमिरा व रवी बिष्णोई यांनी गोलंदाजीत वर्चस्व राखले आहे.
दुसरीकडे बेंगळुरू संघाबाबत बोलायचे तर माजी कर्णधार विराट कोहली याला गवसलेला सूर त्यांचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. कोहली भरात असेल तर समोरच्या कोणत्याही संघावर दडपण राखू शकतो हेच त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या साखळी लढतीत 73 धावांची खेळी करून दाखवून दिले होते.
बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी, ग्लेन मॅक्सवेल व दिनेश कार्तिक यांनी अफलातून कामगिरी केली आहे. त्याचबरोबर वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड व हर्षल पटेल यांच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौचे फलंदाज कशी कामगिरी करतात हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.