एलियाना डिक्रूझच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोणतेच वादविवाद झालेले नाहीत. तिने अजय देवगण, रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम सारख्या हिरोंबरोबर काम केले आहे. आगामी “पागलपंती’मध्येही ती दिसणार आहे. “पागलपंती’च्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे. याच दरम्यान एका फॅनने तिला “आतापर्यंत सलमान खानबरोबर काम का केले नाही?’ असे ट्विट्ररवर विचारले.
त्यावर आपण सलमानबरोबर दोन सिनेमांसाठी कॉन्ट्रॅक्ट केले होते. मात्र नंतर हे सिनेमे आपण सोडून दिल्याचे एलियानाने सांगितले. सलमानच्या फॅन्ससाठी हा धक्काच असणार आहे. सलमानबरोबरच्या “वॉन्टेड’ साठी एलियानाशी संपर्क साधला गेला होता.
मात्र त्यावेळी तिची परीक्षा जवळ आली होती. परीक्षेच्या अभ्यासासाठी तिने “वॉन्टेड’सोडून दिला होता. त्यानंतर सलमानबरोबरच्या “किक’साठीही तिच्याशी संपर्क साधला गेला होता.
मात्र त्यावेळी तारखा न जुळल्यामुळे तिला सिनेमाही सोडून द्यावा लागला होता. तिच्या ऐवजी मग जॅकलीन फर्नांडिसला “किक’मध्ये घेतले गेले होते. आता अजूनही सलमानबरोबर काम करण्याची संधी एलियानाला मिळालेली नाही. जर आता संधी मिळाली, तर ही संधी ती हातातून जावू देणार नाही.