पुणे – महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मंगळवार (दि. 27) पासून या फेरीस सुरुवात होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पहिल्या नियमित फेरीद्वारे 42 हजार 239 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. यातील केवळ 27 हजार 255 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत.
- असे आहे वेळापत्रक
दि. 27 ते 29 जून – प्रवेश अर्जाच्या भाग-1 मध्ये दुुरुस्ती करणे, अर्जाचा भाग-2 भरुन प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदविणे. - दि. 30 जून- डेटा प्रोसेसिंग करुन पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे, विभागीय समित्यांकडून त्याचे पूर्व परीक्षण करुन घेणे.
- दि. 3 जुलै- प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची निवड यादी पोर्टलवर प्रदर्शित करणे, प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय लॉग-इनमध्ये दर्शविणे, फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे, विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालय लॉग-इनमध्ये पाठविणे.