मुंबई – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 360 वी जयंती आज साजरी होत आहे. रयतेच्या सुखासाठी शिवाजी महाराजांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली.
प्राणाची बाजी लावून
स्वराज्यासाठी बेधडकपणे
लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा.श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.#ShivajiMaharaj #ShivJayanti pic.twitter.com/l1tgvghEZ3
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 19, 2020
अशा पराक्रमी आणि बेधडकपणे लढणाऱ्या शिवाजी महाराजांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला आहे. सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
सचिन म्हणाला कि, “प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा. श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा”