मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन कपिल देव यांची बॉलिंग जितकी भेदक होती, तितकीच त्यांची बॅटिंगही तडाखेबाज होती. त्याचीच झलक आपल्याला “83′ मध्ये रणवीर सिंहच्या रुपाने बघायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी ’83’मधील फर्स्ट लूकमुळे चांगलाच चर्चेत आला होता. तर सिनेमाच्या संपूर्ण टीमचा पहिला लूक गेल्या दिवसांपूर्वी शेअर केल्यामुळे हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
त्यानंतर आता या चित्रपटातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर आलं आहे. दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. ’83’ सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिका चौथ्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सुरूवातीला दीपिकानं या सिनेमाला नकार दिला होता पण नंतर मात्र दीपिकानं ती या सिनेमामध्ये रोमी भाटियांची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट केलं केलं होतं.
दरम्यान, 83 च्या वर्ल्डकपच्या विजयावर आधारलेल्या “83’मधील तयारीची काही क्षणचित्रे रणवीरने जून महिन्यात शेअर केली होती. तेंव्हा पासूनच्या ट्रेनिंग आणि फिटनेसच्या जोरावर त्याने स्वतःमध्ये कपिल देव आत्मसात केले आहेत. त्याचा हा “83′ पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होतो आहे.