वाघोली – वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुरेखा सोपान गावडे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामपंचायतीचे तत्कालिन उपसरपंच मुकिंदा शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत सुरेखा सोपान गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या वस्त्यांना जोडणारे अनेक रस्ते वेळोवेळी स्वखर्चाने दुरुस्त करून नागरिकांना नेहमी मदतीचा हात पुढे करणारे म्हणून सोपान गावडे व सुरेखा गावडे दाम्पत्य परिचित आहे. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्या बद्दल पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव, युवा उद्योजक रमेश हरगुडे पाटील यांच्या हस्ते उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सुरेखा गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोपान गावडे, उद्योजक रोहित गावडे उपस्थित होते.
सुरेखा गावडे यांच्या निवडीबद्दल शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक माणिकराव गोते, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, महावितरण समिती सदस्य प्रदिप वसंत कंद, संदीप गोते,राजेश वारघडे, संतोष गावडे, राजेंद्र इंगळे, दिलीप शेटिया, योगेश शितोळे, दीपक गावडे आदींनी अभिनंदन केले आहे.