नांदूर – नांदूर (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुषमा आप्पा घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शीतल बोराटे यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे यारिक्त पदासाठी बुधवारी (दि. 13) सरपंच लता थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सुषमा घुले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व नांदूर ग्रामपंचायत ग्रामसेवक निलेश धारकर यांनी केली.
ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणारी विकासकामे दलित व प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन प्रयत्न करणार आहे.
– सुषमा घुले(नवनिर्वाचित उपसरपंच, नांदूर)
यावेळी मावळत्या उपसरपंच शीतल बोराटे, ग्रामपंचायत सदस्य विशाल थोरात, रवींद्र बोराटे, कैलास गायकवाड, भारती बोराटे, नेहा गुरव, नाना थोरात, अध्यक्ष विजय थोरात, उपाध्यक्ष लक्ष्मण घुले, आप्पा घुले, दतात्रय बर्वे, विजय बोराटे, शिवाजी घुले, दत्ता बोराटे, बारकु घुले, मारूती घुले, केशव बर्वे, पोपटराव बोराटे, रामभाऊ घुले, वडजु घुले, दिलीप बोराटे, सागर थोरात, योगेश बोराटे, प्रवीण बोराटे, रामभाऊ बोराटे, त्रिंबक बोराटे, सखाराम बोराटे, पोलीस पाटील नेहा बोराटे, पोलीस पाटील धोंडीबा थोरात, राजेंद्र गायकवाड, नामदेव पाटोळे, शिवाजी सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते.