वाघोली – पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री वाडेबोल्हाई ग्रामपंचायत सरपंच पदी वैशाली चंद्रकांत केसवड यांची १०३८ मताधिक्याने विजय झाला असून त्यांनी संध्या संपत भोर यांचा पराभव करून लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान मिळवला आहे.
याशिवाय सदस्य पदी नंदकुमार भगवान भोर, सोनाली काळुराम शिंदे,संतोष रामभाऊ चव्हाण यांनी देखील भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. यापूर्वीच वाडेबोल्हाई ग्रामपंचायत निवडणुकीत कीर्ती अमोल पायगुडे, संध्या योगेश गावडे,मोनाली नवनाथ भोर,संदीप नामदेव गावडे, गणेश बाळासाहेब भोरडे,सुमित सदाशिव शिंदे,स्वाती शरद इंगळे, सोनाली राहुल रिकामे हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. हे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यासाठी ग्रामस्थ, आजी माजी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहेत.
वैशाली केसवड यांच्या वडिलांनी सरपंच पद तर त्यांचे पती चंद्रकांत केसवड यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार सांभाळला आहे. ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या साथीने तसेच गावातील जेष्ठ मंडळी आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बंधू-भगिनींच्या आशीर्वादाने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वैशाली चंद्रकांत केसवड यांनी सांगितले आहे.