Election Fake Sms । आगामी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याबाबत समाज माध्यमांतून व्हायरल होणारे सर्व मेसेजेस खोटे असून ते पूर्णपणे अनधिकृत आहेत.
निवडणूक आयोग नेहमी रितसर पत्रकार परिषद घेऊन, निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करत असते. त्यामुळे समाज माध्यमांवर फिरत असलेल्या संदेशांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आयोगाने केले आहे. । Election Fake Sms
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या तारखांवर लागले आहे. राजकीय पक्ष असोत की सामान्य जनता, प्रत्येकाला निवडणुका कधी आहेत हे जाणून घ्यायचे असते.
त्या पार्श्वभूमीवर काही समाजविघातक प्रवृत्तींनी निवडणूक आयोगाचे लेटरहेड वापरुन एक बनावट संदेश तयार केला आहे. या संदेशाची सत्यता तपासली असता, आयोगाकडून असे कसलेही वेळापत्रक जाहीर केले नसल्याचे उघड झाले आहे.
आता अशा बनावट मेसेजबाबत आयोग काही पोलिस कारवाई किंवा सायबर गुन्हा म्हणून नोंद करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. । Election Fake Sms
काय आहे फेक मेसेजमध्ये? । Election Fake Sms
१२ मार्च पासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल
२८ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल
१९ एप्रिल रोजी देशभर मतदान होईल
२२ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल