Arunachal Politics – अरुणाचल प्रदेशातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये आणखी चार आमदारांनी प्रवेश केला आहे. या आमदारांच्या समावेशाने विधानसभेत भाजपचे संख्याबळ वाढले आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसचे दोन आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे दोन आमदार आहेत. | Arunachal four MLAs in BJP
आता 60 सदस्यांच्या अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजपचे 56 सदस्य आहेत. उर्वरित दोन आमदार काँग्रेसचे तर दोन अपक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आसपास होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये हा बदल झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण भाजपाच्या बाजूने झुकले आहे. | Arunachal four MLAs in BJP
अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग आणि वांगलिन लोनडोंग आणि एनपीपीचे आमदार मुचू मिठी आणि गोकर बसर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आसामचे मंत्री आणि अरुणाचलचे भाजपचे निवडणूक प्रभारी अशोक सिंघल हेही उपस्थित होते.
इरिंग पश्चिम पासीघाट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. वांगलिन लोवांगडोंग बोरदुरिया हे बोगापानी येथील आमदार आहेत. मुच्छू मिठी आणि गोकर बसर हे अनुक्रमे रोईंग आणि बसर मतदारसंघातून आमदार आहेत. आता ६० सदस्यीय विधानसभेच्या ५६ जागांवर भाजपचे नियंत्रण आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१ जागा मिळाल्या होत्या. | Arunachal four MLAs in BJP