निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो – येचुरी

नवी दिल्ली – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी आज निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणुकांपूर्वीच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबतीतील आदेशाच्या ‘हेतू’ विरोधात निर्णय घेतला असल्याचा आरोप लावल आहे. निवडणूक आयोगाने आज २२ विरोधी पक्षांकडून करण्यात आलेली, ईव्हीएम मशिन्समधील संपूर्ण मतमोजणीच्या आधी प्रत्येक मतदारसंघातील ५ मतदानकेंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतांची जुळणी व पडताळणी करण्याची मागणी फेटाळून लावत संपूर्ण मतदानानंतरच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतांची जुळणी करण्यात येईल असं म्हंटलं होतं.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर आक्षेप नोंदवत सीताराम येचुरी यांनी आपली भूमिका ट्विटरद्वारे मांडताना, “जर एखाद्या मतदारसंघात ‘एव्हीएम’प्रमाणे एक उमेदवार निवडून आला आणि नंतर व्हीव्हीपॅट मशीन्समधील स्लिप्सच्या जुळणीनंतर तफावत दिसून आली तर अशावेळी सदर उमेदवार आंदोलन करू शकतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे मत मोजणीपूर्वीच व्हीव्हीपॅट स्लिप्सची जुळणी करणं व्यवहार्य आहे.” असं मत व्यक्त केलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.