नवी दिल्ली – मार्च महिन्यात 8.14 लाख नवे रोजगार निर्माण झाले असल्याचे ईपीएफओच्या आकडेवारीवरून दिसून येते.
उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात 7.88 लाख रोजगार निर्माण झाले होते. सरलेल्या पूर्ण वर्षात 67.59 लाख रोजगार निर्माण झाले आहेत.
मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार 2.25 लाख रोजगार 22 ते 25 वयोगटातील कर्मचाऱ्यासाठी तर 2.14 लाख रोजगार 18 ते 21 वर्षाच्या वयोगटासाठी निर्माण झाल्याचे दिसून येते. हे सर्व रोजगार औपचारिक क्षेत्रातील असल्याचे स्पष्टीकरण इपीएफओने केले आहे.