नारायणगाव -वारूळवाडी आरोग्य केंद्रा अंतर्गत धनगरवाडी येथे शनिवारी (दि. 11) 85 वर्षीय करोनासदृश्य आजाराने वृद्धेचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
धनगरवाडी येथे या वृद्ध महिलेच्या कुटुंबात मुंबईहून आलेल्या एका नातेवाईक असलेल्या महिलेमुळे 7 जुलैला या कुटुंबातील 7 जणांना करोनाची लागण झाली होती. संबंधित 85 वर्षीय वृद्ध महिला या आजारी होत्या.घरातील सर्व कुटुंब या वृद्ध महिला करोना सदृश होत्या.
त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यासाठी कुटुंबातील कोणीही सदस्य पुढे येत नसल्याने अखेर गावचे माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य महेश शेळके यांनी धाडस करून स्वतः पीपीई किट घालून अंत्यविधीची सर्व तयारी करून दिल्याने अंत्यविधी करण्यात आला.
वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत पाच गावांमध्ये दोन दिवसांत 10 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आले आहे. तर एकूण 38 पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी 34 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.