जळगाव – जळगाव जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर आणि लोणी घोटाळा प्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांच्या आंदोलनाला यश आले आहे. याप्ररणात गुन्हा दाखल करण्यासाठी खडसेंनी शहर पोलीस ठाण्यासमोर 9 तास ठिय्या मांडला होता.
जिल्हा दूध संघातील दूध पावडर आणि लोणी घोटाळ्या प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
शिंदे-फडणवीसांमध्ये बिनसलं? ‘या’ कारणावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
या घोटाळ्यात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दूध संचालक मंडळासह अन्य कोण जबाबदार आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा दूध संघाच्या चेअरमन म्हणजेच अध्यक्षा एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आहेत.
आता जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत पोलीस काय तपास करतात? जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्यात नेमकं कोण दोषी म्हणून निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.