वृत्तसंस्था – रूस मधील पर्म विद्यापीठावर आज दहशतवादी हल्ला झाल्याची मोठी बातमी समोर आली असून या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत.
An unidentified person has opened fire in one of the buildings of Russia’s Perm State University, leaving several people wounded, according to preliminary reports: Russian News Agency TASS
— ANI (@ANI) September 20, 2021
https://twitter.com/gunsoflogic/status/1439852258720550918
हल्लेखोरांनी विद्यापीठात अचानक गोळीबार केला असून विद्यापिठात असलेल्या विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्यसाठी खिडक्या आणि छतावरून उड्या मारल्या आहेत. सुरक्षा दलांनी हल्लेखोराला ठार केले असून या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत.
विद्यापीठातील झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्यार्थी आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीवरुन उड्या मारताना दिसत आहेत. हल्लेखोरांनी हा हल्ला कोणत्या कारणाने केला हे अद्याप समजू शकले नाही. सुरक्षा रक्षकांच्या म्हणन्यानुसार हल्लेखोरांचा हल्लेखोराचा हेतू धोकादायक होता. त्यांच्याकडे मोठी जीवघेणी हत्यारे होती.