अलोहा क्‍लिनिकतर्फे “हेल्दी हार्ट’ मोहिम; 499 रुपयांत तपासा हृदयाची स्थिती

पुणे – जीवनशैलीजन्य आजार अर्थात हृदयविकार, मधुमेह, स्थूलत्त्व आणि रक्तदाब अशा विकारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी त्यांच्या हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य कसे आहे, हे तपासण्याची मोहिम “अलोहा क्‍लिनिक’तर्फे आयोजित करण्यात आली असून येत्या 29 सप्टेंबर रोजी येत असलेल्या जागतिक हृदय दिनानिमित्त होत असलेल्या या मोहिमेसाठी नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे.

याबाबत “अलोहा क्‍लिनिक’चे निखिल वैद्य यांनी पुण्यात नुकतीच माहिती दिली. ते म्हणाले की, सहसा चाळीशी ओलांडून गेलेल्या व्यक्तींना जीवनशैलीजन्य आजारांचा सामना करावा लागतो. एखाद्याला काहीच झालेले नाही, अशा स्थितीतही सर्वसामान्यपणे दर सहा महिन्यांनी रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण अशा तपासण्या करुन घेणे श्रेयस्कर ठरत असते.

म्हणूनच “अलोहा क्‍लिनिक’तर्फे अवघ्या 499 रुपयांत हृदय स्वास्थ्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून त्यामुळे गंभीर आजार होण्यापूर्वीच सावधगिरीचा इशारा मिलणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी डीपी रोडवरील कर्वेनगरमधील अलोहा क्‍लिनिकला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“अलोहा क्‍लिनिक’मध्ये हृदयविकार, मधुमेह, स्थूलत्त्व आणि रक्तदाब याच्या नियंत्रणासाठी औषधोपरासाह आधुनिक व्यायामाचे प्रकार सुचवले जातात. येथे असलेली आर्टीफिशिअल इन्टेलिजन्सवर आधारित जिम नागरिकांसाठी एक मोठे आकर्षणाचे केंद्र आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन “अलोहा क्‍लिनिक’तर्फे करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.