ED Vs Arvind Kejariwal : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात चौकशीसाठी हजर राहण्याकरता ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत आठ वेळा समन्स पाठवले आहेत. मात्र ते एकदाही हजर झालेले नाहीत. त्यांनी ईडीला पत्र पाठवून १२ मार्चची वेळ मागितली आहे आणि आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला हजर राहू असेही म्हटले आहे.
मात्र अशा प्रकारे त्यांची चौकशी करण्याची ईडीची तयारी नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी केली जाण्याची तरतुदच नसल्याचेही ईडीने म्हटले आहे. ईडीला केजरीवालांची समक्ष चौकशी करायची आहे. | ED Vs Arvind Kejariwal
दरम्यान, याबाबत बोलताना आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की आमची भूमिका तीच आहे. हे समन्स बेकायदेशीर आहेत. भारतीय जनता पार्टीचे लोक बऱ्याच दिवसांपासून म्हणत आहेत की केजरीवाल प्रश्नांची उत्तरे का देत नाही. मात्र केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे की त्यांना उत्तरे देण्यात कोणतीही अडचण नाही. म्हणून त्यांनी ईडीला हे उत्तर पाठवले आहे. | ED Vs Arvind Kejariwal
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तरे देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. आता तरीही ईडीला अडचण असेल तर त्याचा अर्थ असाच होतो की केजरीवाल यांना अटक करण्याची ईडीची इच्छा आहे किंवा त्यांना केजरीवाल यांना अपमानित करायचे आहे. सर्वोच्च न्यायालयातही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाते. मग ईडी काय सुप्रीम कोर्टापेक्षा मोठी आहे ? असा सवाल देखील आपकडून उपस्थित केला जात आहे. | ED Vs Arvind Kejariwal