-ह.भ.प. आदिनाथ म. गुणारे
नातरी निदैवाचा परिवरीं । लोह्या रूतलियां आहाती सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ।।
तैसा हृदयामध्ये मी रामु। असतां सर्व सुखाचा आरामु । कीं भ्रांतासि कामु । विषयावरी ।।
सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात भगवंत आहे, मात्र लोक ते जाणत नाहीत याचे उदाहरण देऊन श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, दुर्दैवी पुरूषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, पण तो तेथे राहून उपवास काढतो म्हणजेच दारिद्य्रात जीवन जगतो. त्याप्रमाणे या शरीररूपी घरात देव आहे; पण दैवहीन मनुष्याला तो दिसत नाही. ओळखता येत नाही.
यातील दुसऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, सर्व सुखांचा जणू बगीचा, असा मी जो राम सर्वांच्या हृदयात असताना मला न ओळखता काही लोक सुखाकरिता विषयांचीच इच्छा करतात