विवाह पद्धत बदलत चालली आहे
वाई, दि. 29 – विवाह समस्या कायम असली तरी तिचे रूप बदलले आहे. आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करू शकत नाही. आजची सामाजिक परिस्थिती पाहिली म्हणजे आपण कुठे जाणार आहोत ते समजत नाही. विवाहात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पूर्वीचे लोक आपल्या मुलांचे लग्न जमवताना चार ठिकाणी चौकशी करीत असत. आता आमची लग्ने आम्ही करणार असे तरुण मुले मुली म्हणत आहेत. सध्या जाहिरातीनुसार लग्न ठरत आहेत, असे
डॉ. कुमार रायकर यांनी म्हटले.
कपड्यासाठी नवीन प्रकारचे लेबल
लंडन – कापड किंवा तयार कपडे यावर कंपन्या आपल्या नावाचे जे लेबल लावतात ते एकाच बाजूने छापलेले असते. पण दोन्ही बाजूंनी छापता येईल असे लेबल एका ब्रिटिश कंपनीने तयार केले आहे. हे लेबल ब्रिटनमध्ये तयार केलेल्या एका कोटेड कापडापासून बनविता येते. या कापडावर दोन्ही बाजूंना छपाई करता येते. नेहमी लेबलवर फक्त एकाच बाजूने छपाई करून त्यावर कंपनीचे नाव व छाप उठविलेला असतो. पण नव्या लेबलच्या मागील बाजूस धुलाईसंबधी सूचना छापल्या जातील.