कामाचा आठवडा पाच दिवसांचा!
मुंबई, दि. 5 – सर्व उद्योगधंद्यांत तसेच राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करण्याचा निर्णय कामगार संघटनांच्या संयुक्त कृतीसमितीने घेतला आहे. समितीने सर्व संघटनांनी आपल्या मालकांकडे एका आठवड्याच्या आत अशी मागणी करून लढ्यास सिद्ध व्हावे असे म्हटले आहे.
शत्रूराष्ट्रे युद्ध सुरू करण्याची शक्यता
नवी दिल्ली – सिक्कीमला भारतात समाविष्ट करणे तसेच काश्मीरमधील नेतृत्वात झालेला बदल या गोष्टींचा राजकीय फायदा उठविण्यासाठी आपल्या शेजारील शत्रूराष्ट्रे नजिकच्या काळात युद्ध सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संयुक्त आयोग लवकरच स्थापन
नवी दिल्ली – सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी संयुक्त आयोग स्थापन करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. संयुक्त औद्योगिक प्रकल्प दोन्ही पैकी कोणत्याही देशात उभारण्यासाठी सौदी अरेबिया कर्ज देणार आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.