मुंबई – भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा याने एका चॅट शोमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम नव्हे तर कोलकात्यातील इडन गार्डन मैदान जास्त लकी असल्याचे सांगितले आहे.
2007 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रोहितचे नशीब खरेतर पुढील वर्षी याच मैदानावर उघडले. 2008 साली आयपीएलच्या पहिल्याच मोसमात याच मैदानावर रोहितने पदार्पण केले होते. याच मैदानावर पदार्पणातील कसोटी सामन्यात रोहितने तडाखेबंद177 धावांची खेळी केली होती.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील एकदिवसीय सामन्यात रोहितने जागतिक क्रिकेटला हादरवून सोडणारी264 धावांची विक्रमी खेळी याच मैदानावर केली होती. आयपीएलमधील पहिले शतक, नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतरचा पहिला सामना, पहिले वहिले आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद अशा अनेक गोष्टी रोहितने याच मैदानावर साकार केल्या त्यामुळेच त्याने इडन गार्डन वानखेडेपेक्षाही जास्त लकी आहे, असे सांगितले.