मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ईडी लवकरच करणार चौकशी; किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई – मागील काही दिवसांपासुन शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या नोटीस आणि चौकशीचे फेरे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेता किरीट सोमय्या यांनी ईडी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौकशी करणार असल्याचा दावा केला आहे.

माझ्याकडे मुख्यमंत्र्याच्या बेनामी मालमत्तेचे पुरावे आहेत. आणि मी ते लवकरच ईडीला देणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हंटले कि, रायगडमध्ये अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेली ९.३५ एकर जमीन उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराने सहा वर्षांपासून  अज्ञात ठेवली आहे. २०१९च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही या संपत्तीची माहिती लपविण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती.

मुख्यमंत्री ठाकरेंची लवकरच निवडणूक आयोगाद्वारे लवकरच चौकशी करण्यात येईल. याशिवाय नोव्हेंबर रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावेही बेनामी मालमत्ता उघडकीस आली आहे, असाही दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणाचा अहवाल आयकर विभाग आणि ईडीला देण्यासही सांगितले आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.