मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने दाऊद इब्राहीमच्या साथिदार इकबाल मिर्चीशी मनी लॉंड्रींग केल्याच्या आरोपावरून चौकशीसाठी प्रफुल्ल पटेल यांना 18 तारखेला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
याबाबत पटेल यांनी मंगळवारी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. सीजय प्रॉपर्टीच्या काम आम्ही कधीही पहात नव्हतो. ना त्याचे प्रमुख होतो. त्याबाबत येणाऱ्या बातम्या असत्य आहेत. सीजय हाऊस ही उमारत 1963मध्ये बांधली. ती 65 लोकांना विकली. या सीजय हाऊसचा मिर्ची हा 2005 मध्ये मालक होता, असा आरोप केला जात आहे.मात्र, या मालमत्तेवर कोर्ट रिसिव्हरचा 1978 ते 2005 पर्यंत ताबा होता, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.