पुसेगाव – निढळ, ता. खटावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळी परिसरात मोठे नुकसान झाले. यावेळी अनेक ठिकाणी झाडे पडली. घराचे पत्रे उडून प्रचंड नुकसान झाले. रस्त्याच्या कडेला झाडाखाली लावलेल्या गाडी ट्रॅक्टरवर झाडे पडून गाडीच नुकसान झाले. पाऊस थोडा वेळच होता पण प्रचंड वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले. यामध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना हा वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त भागांचे ताबडतोब पंचनामे करून ताबडतोब आर्थिक मदत करावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.