मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि कंम्पोजर ‘विशाल दादलानी’ने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा त्याने भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. विशालने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून, ‘ECONOMY त्रस्त, मोदी मस्त’ असं म्हटलं आहे.
Economy त्रस्त, मोदी मस्त. ??
लोगों के पास रोजगार नहीं है, सारे धन्धे ठप्प हैं, GDP ऐसे गिर रही जैसा भाजपा के moral standards हो, और सियाचिन में जवानों के पास सही इक्विपमेन्ट नहीँ है, मगर.. https://t.co/XmhFYaEcIo
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) February 5, 2020
“लोकांकडे रोजगार नाही, सारे उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. देशात जीडीपी असा कमी होत आहे जसा भाजपचा नैतिक स्तर, आणि सियाचिनमध्ये देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत”. असं सुद्धा विशाल म्हणाला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.