बालविवाहाची समस्या कायमच

वुमेन हेल्पलाइनकडे तीन दिवसांत सात तक्रारी

पिंपरी – जग 21 व्या शतकात पोहोचले असताना आजही बालविवाहाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ही समस्या आधुनिक युगातही कायम असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. वुमेन हेल्पलाईनने बालविवाहाच्या प्रथेविरोधात
आवाज उठविण्यास सुरुवात केल्यामुळे या विषयातील गांभिर्य समाजासमोर आले आहे.

“अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा पती गजाआड’ ही बातमी दै. प्रभातमध्ये रविवारी (दि. 2) प्रसिद्ध झाली. त्यानंतर विमेन हेल्पलाइनकडे अल्पवयीन मुलींच्या लग्नाबाबत तीन दिवसांत तब्बल सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

बीड येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह आळंदीत होणार असल्याची माहिती विमेन हेल्पलाइनला मिळाली होती. त्यानुसार या संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आळंदीत धाव घेतली. मात्र याबाबतची कुणकूण आधीच नवरीच्या नातेवाईकांना लागल्याने त्यांनी ऐनवेळी स्थळ बदलून लोणीकंद येथे घाई घाईत विवाह उरकला. मात्र वुमेन हेल्पलाइनच्या पदाधिकाऱ्यांनी बाल विवाह करणाऱ्यांना शोधून काढत पती आणि त्याच्या नातेवाईकांना गजाआड केले. याबाबतचे सविस्तर वृत्त रविवारच्या दै. प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले होते. प्रभातमधील बातमी वाचून गेल्या तीन दिवसांमध्ये वुमेन हेल्पलाइनकडे बालविवाहाबाबत सात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची खातरजमा करून संघटनेकडून कार्यवाही केली जात असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा नीता परदेसी यांनी सांगितले.

लष्करातील एका जवानाने पहिली पत्नी असतानाही 14 वर्षांच्या मुलीसोबत नुकताच विवाह केला. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.कायद्यानुसार सध्या 18 वर्षानंतर मुलीचा विवाह केला जातो. हे वय वाढविण्याचा केंद्र शासनाचा विचार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. मात्र, त्याउलट सध्या होताना दिसत आहे.

नग्न मनोरूग्ण महिलेस केले पोलिसांच्या स्वाधिन

पिंपरी कॅम्प परिसरात एक मनोरूग्ण विवस्त्र महिला गेल्या अनेक दिवसांपासून फिरत असल्याची माहिती विमेन हेल्पलाइनला मिळाली होती. त्या महिलेचा शोध घेऊन विमेन हेल्पलाइनच्या अध्यक्षा नीता परदेसी आणि त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलेला पिंपरी पोलिसांच्या स्वाधिन केले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.