ध्रुव कन्सल्टन्सीच्या उत्पन्नात 30 टक्‍के वाढ

पुणे – पायाभूत सोयींच्या क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेल्या आणि वेगवान प्रगती करीत असलेल्या ध्रुव कन्सल्टन्सीने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी नोंदली आहे. कंपनीची या आर्थिक वर्षातील विक्री 30 टक्‍क्‍यांनी वाढून 56.11 कोटी रुपयांवर गेली, तर निव्वळ नफा 11.63 टक्‍क्‍यांनी वाढून 7.68 कोटी एवढा झाला.

कंपनीचे व्याज, घसारा आणि कर विचारात घेण्यापूर्वीचे उत्पन्न (एबीडिटा) 14. 59 कोटी रुपये होते. ही वाढ 22. 5 टक्‍के आहे. कंपनीचे 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचे एबीडिटा मार्जिन 26 टक्‍के होते, असे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक सुश्री तन्वी औटी म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.