Smriti Mandhana WPL 2024 Final| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावत मोठी कामगिरी केली. मागील 16 वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे फॅन्स यावेळी आनंदी झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर पुरुष संघातील खेळाडूही महिला संघातील खेळाडूंना पाठींबा देताना दिसून आले. या विजयानंतर आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना फार खूश दिसून आली. यावेळी तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मन जिंकली आहेत.
स्मृतीने पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं
गेल्या 16 वर्षांपासून आरसीबीच्या पुरुषांची टीम ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे इंडियन प्रिमीयर लीग सुरु होण्यापूर्वी ‘ई साला कप नामदे’ असा नारा चाहत्यांकडून लगावण्यात येतो. ज्याचा अर्थ, या वर्षी कप आमचा आहे, असा होता. मात्र आता ‘ई साला कप नामदु’ असं स्मृतीने म्हटलं आहे, याचा अर्थ ‘या वर्षी कप आमचा झाला आहे. कन्नड ही माझी पहिली भाषा नाही पण चाहत्यांसाठी हे म्हणणं महत्त्वाचं असल्याचे देखील यावेळी तिने सांगितले.
“मला माझ्या संघाचा अभिमान” Smriti Mandhana WPL 2024 Final|
या विजयानंतर ती म्हणाली की, ‘हे खरंच झालंय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. मला इतकंच म्हणायचंय की, मला माझ्या संघाचा अभिमान आहे. आम्ही बंगळुरुत शानदार कामगिरी केली. मात्र दिल्लीमध्ये आम्हाला २ पराभवांचा सामना करावा लागला. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याबाबत आम्ही आधीच चर्चा केली होती. यांसारख्या काही मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा तुम्हाला योग्यवेळी चांगली कामगिरी करावी लागते. गतवर्षी झालेल्या हंगामातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.’ Smriti Mandhana WPL 2024 Final|
बंगळुरूचा जेतेपदावर कब्जा
महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत उत्त्कृष्ट कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट आणि 3 चेंडू राखून विजय मिळवत महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावलं. यासह महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळाला आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदावर कब्जा केला होता.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात 113 धावा केल्या. आरसीबीने 19.3 षटकांत दोन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात विजेतेपद मिळवले.
हेही वाचा: