नवी दिल्ली :- डोपिंगमध्ये दोषी आढळलेली भारताची महिला धावपटू दुती चंद हिने ओडीशा राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. गेल्या वर्षी घेतलेल्या चाचणीत दुतीने बंदी असलेली औषधे घेतल्याचे स्पष्ट झाले होते व त्यामुळेच तिच्यावर चार वर्षांची बंदी लावण्यात आली. मात्र, आपल्याला कर्करोग झाला होता व त्यासाठी ही औषधे घेतल्याचे दुतीने म्हटले आहे.
तीचे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच ही चाचणी घेतली गेल्याचेही तिने म्हटले आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (नाडा) घातलेली बंदी ही या वर्षी 3 जानेवारी पासून लागू झाली असून या काळात पात्र झालेल्या स्पर्धांमधून तिला अपात्र करण्यात आले आहे.
तिने मिळवलेली सर्व पदके, गुण आणि बक्षिसेदेखील काढून घेण्यात येणार आहेत. या बंदीच्या विरोधात दाद मागण्यासाठी तीला 21 दिवसांची मुदत देण्यात आली असून आपण दाद मागणार असल्याचे दुतीने सांगितले आहे.