Dutee Chand – भारताची अॅथलीट दुती चंदने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि प्रसारमाध्यमांमध्ये तिच्या लग्नाबद्दल एकाच चर्चा रंगली. या पोस्टमध्ये दुतीसोबत तिची महिला समलिंगी जोडीदार मोनालिसादेखील बसलेली आहे. दुतीने तिच्या समलिंगी जोडीदार मोनालिसाबद्दल अगोदरच खुलासा केलेला आहे. त्यामुळे आता त्या दोघांचा सोबतचा फोटो पाहून सगळ्यांनीच त्यांनी विवाह रचला असल्याचे बोलले आहे. मात्र, आम्ही या फोटोबाबत अधिकची माहिती मिळवली तेव्हा समजले की, हा फोटो त्यांचा लग्नाचा नाही. माध्यमांमध्ये या फोटोच्या आधारे त्यांचे लग्न झाले असल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय.
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
दुती चंदने ( Dutee Chand ) या फोटोव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लग्नाविषयीची माहिती सोशल मीडियावर दिलेली नाही. दुतीने तिच्या समलिंगी जोडीदारासोबतचा फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील शेअर केला आहे. महत्वाचं म्हणजे दुतीने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर एक दिवस अगोदर बहिणीच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या लग्नाच्या फोटोंमध्ये दुती आणि तिची जोडीदार मोनालिसा त्याच पोषाखामध्ये दिसत आहेत. त्यामुळे एक बाब स्पष्ट होत आहे की, दुतीने शेअर केलेला फोटो तिच्या लग्नाचा नसून तिच्या बहिणीच्या लग्नातील आहे.
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
दुती चंदच्या ( Dutee Chand ) बहिणीचे एक दिवस अगोदर लग्न झाले होते. बहिणीच्या लग्नात दुतीची समलिंगी जोडीदार मोनालिसाही उपस्थित होती. याच लग्नाच्या कार्यक्रमात असतानाचा दुतीने तीची जोडीदार मोनालिसासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिने ट्विटर खात्यावर फोटो शेअर करताना लिहिले की, “तुझ्यावर कालही प्रेम केलं आणि आताही करत आहे. प्रेन नेहमीच राहील.”
“Loved you yesterday, love you still, always have, always will.” pic.twitter.com/1q3HRlEAmG
— Dutee Chand (@DuteeChand) December 2, 2022
दुती चंदचा ( Dutee Chand ) जन्म ओडिशातील जिजापूर जिल्ह्यात झाला आहे. ती धावपटू असून तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. २०१२ अंडर-१८ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तिने १०० मीटर शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि तेव्हा दुती प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर, २०१३ मध्ये तिने आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या २०० मीटर प्रकारात कांस्यपदक जिंकले.
View this post on Instagram
ट्रॅक अँड फील्डमध्ये दुतीने १०० मीटर शर्यतीत ११.३२ सेकंद घेतले आहेत. २०१९ मध्ये इटलीत झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्येही दुतीने विक्रम रचला होता. कॉमनवेल्थ गेम्स 2014 दरम्यान दुती चंदचे ( Dutee Chand ) हार्मोन वाढल्याची चर्चा समोर आली होती. यानंतर तिच्यावर पुरुष असल्याचा आरोपही झाला होता. यामुळे ती 2014 च्या ओलिम्पिक गेम्समध्ये भाग घेऊ शकली नव्हती.