मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राज्यात नवीन महाविकासआघाडी निर्माण झाली असून आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व मित्रपक्ष मिळून हि आघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान, आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे शपथ घेतील.
या शपथविधीला राज्यभरातून कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तिन्ही पक्षाचे आमदार,खासदार देखील आले आहेत. शपथीविधीला आलेले शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपशी मैत्री असताना रावसाहेब दानवे नावाच्या प्राण्याने मला हरवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता मी खुश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.