५० व्या इफ्फीमध्ये डायरेक्टर्स ऍक्टर या विशेष कार्यक्रमात शुक्रवारी (दि.२२) बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर आणि नो एन्ट्री, वेलकम, सिंग इज किंग, वेलकम बॅक या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिस बाझमी या दोघांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. सिनेअभिनेत्री तिस्का चोप्रा हिने या दोघांची मुलाखत घेतली.
अनिल कपूर आणि अनिस बाझमी या दोघांनी खूप सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. अभिनेता म्हणून अनिल कपूर आपल्याला नेहमीच आवडतो, मी अनिल यांना राज कपूर यांच्या काळापासून ओळखतो. तसेच, मी अनिल कपूर यांचे ‘लाडला’ आणि ‘दिवाना मस्ताना’ अश्या अनेक चित्रपटांचे लिखाण केले आहे. असे अनिस बाझमी यांनी सांगितले.
तर विनोदी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणारे अनिस बाझमी यांचं आजवरचं काम हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असं अनिल कपूर म्हणाले.
या मुलाखती मधील काही महत्वाचे क्षण डिजिटल प्रभात ने तुमच्या साठी आणले आहेत, थेट इफ्फी, पणजी गोव्याहुन.