मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा रंगणार आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहिती नुसार या दिमाखदार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. ज्यामध्ये कलावर्तुळातील काही प्रसिद्ध चेहरेसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित तसेच, जेष्ठ गायिका आशा भोसले यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.