मुंबई – आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात आजच्या काळानुसार रामायण मोठ्या पडद्यावर सर्वांसमोर प्रदर्शित झाला. मात्र रिलीजच्या पहिल्याचं दिवशी या चित्रपटावर नेटकऱ्यानी समीक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लूकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. इतकंच नव्हे तर या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटावरून पहिल्याच दिवशी वाद सुरू झाला आहे.
दिग्दर्शक ओम राऊत यांनी नुकतेच या सर्व वादावर आणि टीकेवर वृत्त वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले,’रामायण खूप मोठे आहे. त्यामुळे ते कुणालाही समजणे शक्य नाही. जर कुणी म्हणत असेल की त्यांना रामायण समजतं तर ते मुर्ख आहेत किंवा ते खोटं बोलत आहेत.
ते पुढे म्हणाले,’आदिपुरुषमध्ये युद्धकांड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी आपण जे टीव्हीवर रामायण बघतले, जे पाहून मी मोठा झालोय, ते खूप मोठ्या स्तरावरचं होतं. आणि आदिपुरुषमध्ये युद्धकांडमधीलही एक लहानसा भाग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. युद्धकांडमध्ये ते पराक्रमी आणि पराक्रमी राम आहेत.”असेही ते म्हणाले.