मुंबई – छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. या शोची नेहमीच चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र आता लवकरच बिग बॉस ओटीटी सीझन 2 येणार आहे. गेल्या वर्षी सुरू झालेला हा शो चांगलाच लोकप्रिय झाला होता. आता हा शो पुन्हा भेटीस येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मागील वर्षी हा शो दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला होता. आता हा शो अभिनेता सलमान खान होस्ट करणार आहे.
विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटीमध्ये 2 मध्ये सनी लिओनी दिसणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र यामध्ये ती स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार की खास पाहुणी कलाकार म्हणून सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सनी लिओनीच्या एका जवळच्या व्यक्तीने सनी लिओन बिग बॉस ओटीटीच्या लॉन्च एपिसोडला उपस्थित राहणार आहे. ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होणार नसून तर सनी खास पाहुणी म्हणून सहभागी होणार असल्याचा खुलासा केला आहे.
या वृत्तानंतर सनीचे चाहते खुश झाले आहेत. याशिवाय सनी आणि सलमान एकत्र दिसणार असल्याने चाहते ही या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. सनी लिओनी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी चित्रपटाच्या उल्लेखनीय यशामुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री ‘जिया शंकर’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणार असल्याचे समजते. जियाने मराठीसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील चित्रपट केले आहेत.