पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना पाटस टोलनाक्यावर धोका
वरवंड- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोल नाक्यावर “फास्ट-टॅग’द्वारे टोल वसुली सुरू करण्यात आल्यापासून टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. पुण्याकडून येणाऱ्या दुचाकी वाहनांना टोल नाक्यावरून पुढे जाण्यासाठी जागाच राहत नसल्याचे चित्र आहे. दुचाकीस्वारांना धोकादायक रीतीने मोठ्या वाहनांजवळून वाहने पुढे न्यावी लागत आहेत, त्यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल नाक्यावर “फास्ट-टॅग’द्वारे टोल वसुली सुरू करण्यात आली आहे.
टोल नाक्यावर सरकारी नियमानुसार रोख रकमेसाठी स्वतंत्र लेन आणि फास्ट-टॅगसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या टोल नाक्यावर फास्ट-टॅग नसणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने, रोख रकमेच्या लेनवर अधिक वाहने येतात आणि तिथे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहन चालक आपली वाहने पुढे नेण्यासाठी अधिक प्रयत्न करीत आहेत. यातूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे.
या सगळ्या गोंधळात दुचाकीस्वारांच्या लेनमधून दुचाकी नेण्यासाठी जागाच राहत नसल्याने दुचाकी वाहने अडकत आहेत किंवा दुचाकीसाठी अगदीच थोडी जागा राहत असल्याने दुचाकीस्वारांना अवजड वाहने, ट्रक, चारचाकी वाहने यांच्या जवळून धोकादायक रीतीने टोल नाक्यावरून आपले वाहन न्यावे लागत आहे, जे दुचाकीस्वारांना धोकादायक ठरत आहे.
यामुळे पाटस येथील टोल नाका प्रशासनाने दुचाकी जाण्यासाठी पुरेसा मार्ग ठेवावा आणि या मार्गावर इतर वाहने येऊ नयेत याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी दुचाकी वाहनचालकांकडून होत आहे.
- पाटस येथील टोल नाक्यावरून दुचाकीस्वारांना जायला जागा राहत नाही, यामुळे धोकादायक रीतीने प्रवास दुचाकी स्वारांना करावा लागत आहे. टोल प्रशासनाने दोन्ही बाजूला दुचाकी जाण्यासाठी रोड राहील याची दक्षता घेतली पाहिजे. दोन्ही बाजूला एक एक सुरक्षा रक्षक दुचाकीसाठी मार्ग राहील याची दक्षता घेण्यासाठी ठेवला पाहिजे. जर पाटस टोलनाक्यावर दुचाकी स्वारांचा अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पाटस येथील टोल प्रशासनाची राहील
– मनोज फडतरे , माजी सरपंच कुसेगाव - दुचाकीसाठी टोल नाक्याच्या दोन्ही बाजूला स्वतंत्र रस्ता ठेवला आहे. मात्र काही चारचाकी वाहनचालक सांगून ऐकत नाहीत, दुचाकीच्या लेनमध्ये वाहने घालतात, त्यामुळे
– वैभव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, पाटस टोल नाका