शिर्डीबद्दल श्रद्धा व सबुरी
साईबाबांच्या जन्मभूमीबाबत सुरू असलेल्या वादाबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी श्रद्धा व सबुरी इतकेच मोजके उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत असलेल्या बैठकीत यावर योग्य तोडगा निधेल असा विश्वास व्यक्त केला.
नगर – शहरातील कोठला येथील ईदगाह मैदानावर सीएए व एनआरसी कायद्याविरोधात होत असलेल्या सभेला हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी विरोध दर्शविल्याने त्यांच्यासह 29 जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता सध्या दिसत आहे.रात्री उशिरापर्यंत मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सभा सुरु होती.
नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए, एनआरसी कायद्याविरोधात राज्यस्तरीय निषेध सभा सायंकाळी उशिरा झालीे. ही सभा म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असा आरोप करत धनंजय देसाई यांनी या सभेला विरोध दर्शविला असून, सभास्थळी जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले .धनंजय देसाई यांनी ईदगाह मैदानात होत असलेल्या सभेला विरोध करत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे रॅलीला परवानगी मागितली होती.
तोफखाना पोलिसांना ती नाकारली. त्यानंतर ते निर्णयावर ठाम राहिले. औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहातून त्यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निवडक कार्यकर्त्यांसह पोहचले.
त्यांनी ईदगाह मैदानात होत असलेल्या सीएए व एनआरसी कायद्याविरोधातील सभेला विरोध दर्शविणारे निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी सभास्थळी जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना बोलावून दाखविला. शहर पोलिसांनी त्यांना समज दिली. तरी देखील ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. शहर पोलीस अधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी धनंजय देसाई यांच्यासह 29 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
इंटरनेट सेवा विस्कळीत
शहरातील कोठला येथील ईदगाह मैदानावर होत असलेल्या सीएए व एनआरसी कायद्याविरोधात होत असलेल्या सभेला हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी विरोध दर्शविल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची चर्चा शहरात होती. मात्र याबाबत पोलीस प्रशासनाकडे विचारणा केली असता इंटरनेट सेवा बंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
देसाईवर जिल्हाबंदीची मागणी
जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले असताना सभास्थळी येऊन सभेला विरोध दर्शविण्याचा इशारा देणारे व जातीयवाद पसरविणाऱ्या हिंदूराष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्यावर जिल्हा बंदीची कारवाई करण्याची मागणी सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधी सर्वधर्मिय कृती समितीच्या वतीने करण्यात आली.