मुंबई : क्रूझ ड्रग प्रकरणापासून ते आजपर्यंत राज्यातील राजकारणात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत असल्याचे समोर येत आहे. त्यातच आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आरोप करत राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिकांच्या निशाण्यावर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आल्याचे दिसत आहे. नवाब मलिकांनी आज माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन ड्रग्जचा खेळ राज्यात सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
निरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतोय असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. गुंडेच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस यांचे मायाजाल चालायचे असे नवाब मलिक म्हणाले आहेत. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केला आहे असे सांगत मलिक यांनी वर्मा नावाच्या व्यक्तीने राणाबद्दलची सर्व माहिती दिल्याचे म्हटले आहे.
Photograph of Jaideep Rana with Ex Maharashtra CM Devendra Fadnavis pic.twitter.com/Sxo1diTalX
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्जच्या धंद्याशी काय कनेक्शन होतं याची चौकशी व्हावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हावी. यासंदर्भात न्यायिक चौकशी व्हावी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करावे, असे आवाहन फडणवीस यांना केले आहे. तसेच फडणवीसांचे या ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहेत, याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली.
भाजपामध्ये अनेक जण ड्रग्ज पेडलर होते, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. मला बोलण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा स्पष्ट आरोप मलिक यांनी केलाय. केला.
फडणवीस मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. त्यामुळे केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करायला लावावा. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी यंत्रणेचा वापर केल्याचंही मलिक म्हणाले. जयदीप राणा सध्या तुरुंगात आहे. याच राणाने देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यासाठी फायनान्स हेड म्हणून काम पाहिल्याचंही नवाब मलिक म्हणालेत.
Details of 'River Song' which shows Jaydeep Rana as Finance Head.
Song sung by Ms. Amruta Fadnavis
Video shows Devendra Fadnavis and Sudhir Mungatiwar as actorshttps://t.co/LddkleoTaQ pic.twitter.com/lWnq2d4wF6— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
तर दुसरीकडे, जयदीप राणाचा फोटो आज नवाब मलिक यांनी ट्वीट केला. जयदीप राणाचा हा फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबतचा होता. अमृता फडणवीस यांनी एक रिव्हर अँथम गायलेलं होतं. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकलेले होते. याच गाण्याचा फायनांसर हा जयदीप राणा होता, अशी माहिती नवाब मलिकांनी बोलताना दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्सचा खेळे सुरु आहे, असा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला आहे. नीरज गुंडे नामक व्यक्तीचं नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील ‘वाझे’ होते, असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.
चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
सामाजिक न्याय केंद्रीय राज्य मंत्री बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवलेल्या व्यक्तीचं समर्थन करत आहेत. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अपाध्यक्ष अरुण हलदरजी भाजपचे नेते असतील. पण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. कार्यपद्धती समजून घ्यावी. ज्या पदावर बसले आहेत, त्यांचं आचरण कसं असायला हवं? या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडत आहेत. समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन ते क्लिन चीट कशी देऊ शकतात? संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती समीर वानखेडे यांना क्लिनचिट कशी देऊ शकते? याची आम्ही राष्ट्रपती आणि सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी करणार आहोत.
बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीबद्दल ममत्व का दाखवतं होते? त्यांनी मला अशीही धमकी दिलेय की, जास्त बोलाल तर अट्रासिटी कायद्याअंतर्गत कारवाई करुन तुरुंगात टाकू. जो व्यक्ती मागासवर्गीय नाही, त्याच्या आधारावर तुम्ही मला धमकावायचं काम करत आहात? आमचाही राजकीय अनुभव आहे. सर्वांनी मर्यादेत राहायला हवं, असे नवाब मलिक म्हणाले.