पुणे-अमलीपदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराला पोलीस पथकाने अटक केली. त्याच्याकडून 56 हजारांचा अमलीपदार्थ, दुचाकी आणि मोबाइल असा 1 लाख 26 हजारांचा ऐवज जप्त केला.
अभिजित रवींद्र कोतवाल (26,रा. वडगावशेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमलीपदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी उंड्रीतील एका इमारतीजवळ कोतवाल हा अमलीपदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले.