वॉशिंग्टन – अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून उभे असलेले चारही संसद सदस्य विजयी झाले आहेत. डॉ अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती अशी त्यांची नावे आहेत. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये या चौघांची फेरनिवड झाली आहे.
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मूळ भारतीय वंशाचे मतदार हा एक मोठा राजकीय फोर्स म्हणून पहिल्यांदाच उदयाला आला आहे. तेथे भारतीय वंशाचे एकूण 18 लाख मतदार आहेत. या मतदारांना आकर्िर्षत करण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न केले होते. भारतीय वंशाच्या खासदारांसाठी सामोसा कॅकस असे नाव कृष्णमूर्ती यांनी प्रचलित केले होते. हे नाव तेथे चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
राजकीय नेत्यांच्या मुलीही बिहारच्या आखाड्यात
यंदा प्रथमच डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस या मूळ भारतीय वंशाच्या महिलेची उपाध्यक्षपदासाठी निवड जाहीर केली आहे, हाही तेथे एक लक्षणीय मुद्दा ठरला होता. यावेळच्या निवडणुकीत राजा कृष्णमूर्ती या 47 वर्षीय भारतीय उमेदवाराने प्रिस्टन नेल्सन यांचा एकतर्फी पराभव केला. त्यांना झालेल्या मताच्या एकूण 71 टक्के मते पडली. रो खन्ना यांना रितेश टंडन या भारतीय उमेदवाराने लढत दिली होती पण ही लढतही खन्ना यांनी एकतर्फी स्वरूपातच िंजंकली.
येस बॅंक प्रकरण : वाधवान बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला
खन्ना हे कॅलिफोर्निया जिल्ह्यातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. डॉ अमी बेरा यांनी यंदा सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ते रिपब्लिकन उमेदवारापेक्षा 25 टक्के मतांनी आघाडीवर होते. ही बढत तेथे निर्णायक मानली गेल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे.