वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर लोकप्रियता कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ट्रम्प यांचे ट्विटरवरील 2 लाख 20 फॉलोअर्स मागील दोन आठवड्यांमध्ये कमी झाल्याचा अहवाल फोर्ब्सने दिला आहे.
आणखी एका अहवालानुसार 17 नोव्हेंबरला ट्रम्प यांचे 88 कोटी 96 लाख 4 हजार 791 फॉलोअर्स होते, तर 5 डिसेंबर रोजी 88 कोटी 74 लाख 4 हजार 369 फॉलोअर्स होते.
उलट अमेरिका अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारे ज्यो बायडन यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 11 कोटी 1 लाख 80 हजारांवरून 20 कोटी 65 लाख 3 हजार 432 झाली आहे.त्यांच्या फॉलोअर्समध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली.