वंदना बर्वे
नवी दिल्ली – बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नेत्यांच्या मुलांसोबतच मुलींनीही ताल ठोकली आहे. चार माजी मंत्र्यांच्या मुली मैदानात धुवाधार प्रचार करीत आहेत. राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलंही मैदानात आहेत.
यंदा बिहार निवडणुकीत नेत्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलींनीही मैदान गाजवण्यास सुरवात केली आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाच्या मैदानात आधी मुलांना संधी देणाऱ्या नेत्यांनी यंदा मात्र मुलींना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह, जेडीयूचे दिनेश सिंह आणि विनोद चौधरी यांच्या मुली निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
पोलीसांनी मला मारलं – अर्णब गोस्वामी
पटनाच्या बंकीपूर मतदारसंघातून पुष्पम प्रिया चौधरी, तारापूर विधानसभा मतदारसंघातून दिव्या प्रकाश, गायघाट मतदारसंघातून कोमल सिंह आणि जमुई मतदारसंघातून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नेत्यांच्या या मुलींकडे संपूर्ण बिहारची नजर आहे. कोमल सिंहचे वडील नितीश यांचे निकटवर्ती तर आई एलजेपीची खासदार आहे.
पुणे : अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजप रस्त्यावर
एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या कोमल सिंह गायघाट मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत. 27 वर्षीय कोमल जेडीयूच्या महेश्वर यादव यांना टक्कर देणार आहे. कोमलचे वडील दिनेश सिंह हे नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात, पण त्यांनी आपल्या मुलीसाठी अजूनपर्यंत प्रचार सुरू केला नाही. तर आई वीणा देवी या एलजेपीच्या खासदार आहेत. वीणा देवी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीच्या रघुवंश प्रसाद सिंह यांना पराभूत केले होते.
शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेला 1200 कोटींचा फटका
श्रेयसी सिंह जमुईमध्ये कमळ फुलवणार?
बिहारचे दिग्गज दिवंगत नेते दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह राजकीय वातावरणातच लहानाची मोठी झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी 29 वर्षीय श्रेयसी जमुई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. 28 ऑक्टोबरला जमुईमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. श्रेयसीचे वडील आणि आई पुतुल देवी दोघेही खासदार राहिले आहेत. श्रेयसी अपक्ष उमेदवार अजय प्रताप सिंह आणि आरजेडीच्या विजय प्रकाश यांना आव्हान देत आहे.
येस बॅंक प्रकरण : वाधवान बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला
दिव्या प्रकाशही निवडणुकीच्या रिंगणात
माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव यांची मुलगी दिव्या प्रकाश या निवडणुकीत पहिल्यांदाच तारापूर विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहे. 28 वर्षीय दिव्या विवाहित असून आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. दिव्याची एक बहीण सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. तारापूर विधानसभा मतदारसंघातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दिव्या जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांना टक्कर देत आहे.
अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ! मुंबई पोलीसांनी दाखल केला ‘हा’ नवा गुन्हा
पुष्पमच्या एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ
जेडीयू नेते आणि विधान परिषदेचे सदस्य विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरीच्या राजकारणातील एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मूळच्या दरभंगा येथील असलेल्या पुष्पमने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. पुष्पम प्लूरल्स पार्टीची संस्थापक अध्यक्ष आहे. बांकीपूरमधून निवडणूक लढवणाऱ्या पुष्पमपुढे तगडे आव्हान आहे. भाजप नेते नितीन नवीन आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा यांचा सामना करावा लागणार आहे.