“तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही, काळजी नसावी”

नांदेड- कोरोनाची परिस्थिती प्रचंड बिकट होत आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, तुम्हाला कोणतीही कमतरता भासणार नाही, आरोग्य सेवेची काळजी करु नका, हाताबाहेर काहीच जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांना दिला आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेनिमित्त अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. “कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन प्रयत्न करत आहे. या लढ्यात मी स्वतः शासन पातळीवर दक्ष असून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही.” , असंही ते म्हणाले.

आयसीयूंच्या खांटामध्ये नवी भर पडली असून अतिगंभीर रूग्णांवर प्राधान्याने उपचार केले जातील. तर काही प्रमाणात वाहतुकीच्या कारणामुळे ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा नसून वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्याचं व्यवस्थापन जिल्हा प्रशासनामार्फत योग्य पद्धतीने केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.