पिंपरी – शहरातील इंडिया आघाडी व समविचारी संघटनांच्या वतीने ईव्हीएम हटवा आणि मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी करीत पिंपरीत निदर्शने करण्यात आली. तसेच प्रसार माध्यमांवर घातल्या जाणा-या बंदीच्या विरोधातही येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, सतीश काळे, ब्रम्हानंद जाधव, प्रवीण कदम, सतीश खांबे, वैभव जाधव, प्रताप गुरव, अनंत कोराळे, प्रकाश जाधव, हरीश मोरे, अशोक सातपुते, विशाल जाधव, सुरेश गायकवाड, काशिनाथ जगताप, ज्योती जाधव, नरेंद्र बनसोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मतदान प्रकिया ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, तसेच न्यूज चॅनेलवर घातलेली बंदी मागे घ्यावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.